कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना शिलाई मशीनचे वाटप

BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

पुणे : BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रोजगार व व्यवसाय करण्यासाठी नुकतेच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी कंपनीचे सहायक सरव्यवस्थापक AIS विठ्ठल पाटील, एच.आर हेड लक्ष्मण कारभारी, परचेस हेड हेमंत जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक Exhaust System उमेश टाक, सहा.लेखा व्यवस्थापक आशिष कुमार धारस्कर, सहा. व्यवस्थापक एच.आर. व प्रशासन अपर्णा पाटील, उत्तम बोडके, गजानन गुरव, उदयकाळ फाऊंडेशन चे अध्यक्ष बाळकृष्ण बागुल, व्यंगचित्रकार विश्वास सूर्यवंशी – पुणे, लोकमंगल सर्वसेवा सोसायटी, पुणेचे अध्यक्ष जयश्री पाथरकर आदी उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित कोविड मधील एकल महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक घटना घडल्या त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच कुटुंबातील कर्तव्यक्त्यांच निधन झालं आणि त्यानंतर अनेक महिला एकल झाल्या. या महिलांचे पुढं आर्थिक सामाजिक प्रश्न यावर कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम सुरू झाले. याच धर्तीवर एकल महिलांना आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले. यामुळे महिला घरी बसून देखील शिलाईचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू शकतील या उद्दिष्टाने मशीन देण्यात आले. त्याचप्रमाणे २० महिलांचा उदयकाळ सावित्री महिला बचत गट स्थापन करून महिलांनी जे उत्पन्न कमावले त्यातुन बचतीची सवय लागणे व पुढे व्यवसाय वाढण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरती साळी, कार्तिक चव्हाण यांनी सहकार्य केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्षा डांगे यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!