श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न

महिला सदस्यांनी केला हळदी कुंकवाचा कार्यक्रम

श्रोत्यांशी संवाद साधतांना प्रा.म.सी.हळपे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पासाहेब सोनवणे, श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सचिव रागिणीताई पुराणिक.

भुसावळ : येथील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेत नुकताच सभासदांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सभेच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ आप्पा सोनवणे होते. सुरुवातीला माल्यार्पणानंतर श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सचिव रागिणीताई पुराणिक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमिलाताई बऱ्हाटे यांनी राम नाम जपाने केली. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन व विश्व प्रार्थनेने सभेत चैतन्य आले. प्रारंभी अर्जुन तनवाणी यांनी भक्ती गीत म्हटले. अलकाताई अहिरे, पोपटराव पाटील, आप्पासाहेब सोनवणे, विलासराव बेंद्रे यांनी आपले कलागुण सादर केले.

प्राध्यापक म.सी.हळपे यांनी किसमिस चा विनोदी किस्सा सांगून श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्या मिळविल्या. ते म्हणाले की, अडल्ट ओपन किसिंग ईज मिसिंग इन इंडिया, होल्डिंग द हँड्स पेक्षा फोल्डिंग द हँड्स ला प्राधान्य देणारी आपली संस्कृती आहे. पाश्चात्य लोकांचे अनुकरण आपल्याला प्रत्येक बाबतीत परवडणारे नाही असा इशाराही दिला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महिला सदस्यांनी विविध वाण वाटून हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न केला. सर्व गुणवंतांच्या उपक्रमांचा परामर्श घेत सचिव रागिणीताई पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन संजय चापोरकर यांनी केले. पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!