खवशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावर्षी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भागवत सूर्यवंशी यांना शाळेत ध्वजवंदनाचा मान मिळाल्याने त्यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

शाळेच्या मुलामुलींची गावातून प्रभातफेरी काढण्यात येऊन सामाजिक एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य अरुण देशमुख, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शामकांत देशमुख, खवशी गावचे सरपंच सौ.जयश्री अरुण देशमुख, उपसरपंच गणेश बाविस्कर, सदस्य सौ.गौरी कैलास पाटील, सौ.आशा अरुण गोसावी, सौ.मंदाबाई गुलाब पाटील, धनराज परशुराम पवार, अनिल पंडीत शिरसाट, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसाद कापडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सदस्य रोहीदास बंडू कापडे, मुख्याध्यापक हिंमत चौधरी, संदीप देसले, राहुल पाटील, नाना कोळी, अंगणवाडी सेविका, शिक्षक पंकज शिसोदे, अजय कोळी, दिलीप कंखरे, शिक्षिका पूनम पवार व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!