पत्रकार हा समाजाचा आरसा.. पत्रकारांची भूमिका, संघर्ष समजून घेणे आवश्यक : उद्घाटक ॲड. नितीनजी ठाकरे

व्हाॅईस ऑफ मीडिया, उत्तर महाराष्ट्र विभागाचा केडर कॅम्प ची यशस्वी सांगता


(दिव्यचक्र वृत्तसेवा)

नाशिक : समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचे वृत्तांकन पत्रकार करीत असतो. आपला जीव धोक्यात घालून पत्रकार काम पार पाडत असतो. त्याअनुषंगाने पत्रकाराने उचललेले प्रत्येक पाऊल ही एक क्रांती असल्याने पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. मविप्र तर्फे पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर घेऊ असे आश्वासित केले. शासनाने आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी पत्रकारांची भूमिका, संघर्ष समजून घेणे आवश्यक असल्याचे मत मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस तथा कार्यक्रमाचे उद्घाटक ॲड. नितीनजी ठाकरे यांनी व्यक्त केले. यावेळी जागतिक स्तरावर केवळ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे एकमेव संघटन असलेल्या व्हाॅईस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरम, नाशिक तर्फे उत्तर महाराष्ट्र नाशिक यांचा ‘विभागीय केडर कॅम्प २०२६’ रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आय.एम.आर.टी. महाविद्यालयातील सभागृहात पार पडला. त्यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. व्हाॅईस ऑफ मीडिया उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. व्हॉईस ऑफ मिडीयाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिलीप साळुंखे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.

अध्यक्षीय मनोगतात व्हॉईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले की, संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४-५ वर्षांपासून व्हॉईस ऑफ मिडीया संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून भारतात नव्हे तर ७६ देशात संघटनेचे जाळे पसरले आहे. अनेक पत्रकार संघटनेत कार्यरत आहेत. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थितांकडून अपेक्षा जाणून घेत समर्पक उत्तरे दिली.

व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी व्हाईस ऑफ मिडियाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यात विमा, शिक्षण, आरोग्य, निवारा, गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले. संघटना चालविताना कधी कधी कटू निर्णय घ्यावे लागतात. अधिस्विकृती साठी कडक निर्बंध आहेत. शासनाकडे फुकटच्या योजनांसाठी पैसा आहे मात्र पत्रकारांसाठी काय ? असा सवालही उपस्थित केला.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात समुपदेशन तज्ञ सिताराम कोल्हे यांनी मानसिक ताणतणावा बाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात मुंबई येथील इंटरनॅशनल मोटिवेशन स्पीकर रत्नाकर अहिरे व सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक दिपक देसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटच्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली गटचर्चा होऊन विजेता गटास स्पिकर रत्नाकर अहिरे व पोलीस निरीक्षक दिपक देसले यांचे शुभहस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागीय प्रमुख दिलीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागीय टीमचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!