शिवजयंती पंधरवाडा निमित्त करणखेडा येथे वि.या.पाटील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागृती

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पंधरवाडा निमित्त काल दि.२८ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील करणखेडा येथे वि.या.पाटील माध्यमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून शिवश्री बापूराव ठाकरे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पुरूषोत्तम सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर चे अध्यक्ष प्रा.अशोक पवार होते. सोबत विचार मंचावर बाल विद्यार्थी वक्ता अजिंक्य सोनवणे व शिक्षक उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी सानेगुरुजी शाळा, अमळनेर येथील इयत्ता नववी तील विद्यार्थी वक्ता अजिंक्य सोनवणे याने आपले मौलिक विचार मांडले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेहल शिसोदे, दिव्यांनी साळुंखे, हर्षल पाटील, प्रशांत पाटील, कमलेश नगराळे, रितेश पवार, नयना पाटील, हितेश चौधरी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या वक्तृत्वाला उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय भवानी.. जय शिवराय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

प्रा.अशोक पवार यांनी शिवजयंतीचा पंधरवाडा सर्वत्र साजरा केला जात असल्याचेही सांगितले. युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर आयोजित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत ७५ वक्ते घडवून ७५ ठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्याबाबतची भूमिका सांगितली. याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक नंदकिशोर पवार, साहेबराव पाटील, अजय पांडे, मुरलीधर चव्हाण, प्रशांत पाटील, आनंदा धनगर, उपशिक्षिका अर्चना सोनवणे, कल्पना सूर्यवंशी, शिपाई राजेंद्र सोनवणे, किशोर शिसोदे, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नंदकिशोर पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद यांनी विशेष प्रयत्न केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!