
प्रा.डॉ.नंदा कंधारे यांनी आपल्या मनोगतातून, विद्यापीठात युवती सभा या उपक्रमाला कधीपासून सुरुवात झाली ? या उपक्रमांतर्गत आजपर्यंत महाविद्यालयामध्ये व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा, स्वयंशिध्दा अभियान इ. कार्यक्रम कसे यशस्वी करण्यात आलेत ? हे सांगत महाविद्यालयातील युवती सभा कार्यक्रमावर दृष्टी टाकत पूर्वातिहास उलगडला. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी युवतींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय पाटील यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सात दिवसीय कार्यशाळेचा दिनक्रम सांगितला. या सात दिवसीय कार्यशाळेत पहिला दिवस उद्घाटन समारंभ, दुसरा दिवस मारवड पोलीस स्टेशनला भेट, तिसरा दिवस सेंट्रल बँक मारवड येथे भेट, चौथा दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र मारवडला भेट, पाचवा दिवस मारवड ग्रामपंचायत मध्ये जाऊन कृषी अधिकारी, तलाठी व ग्राम विस्तार अधिकारी यांची भेट घेऊन माहिती घेणे, सहाव्या दिवशी व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शक म्हणून परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत महिला मार्गदर्शकांना बोलवून स्वयंरोजगार निर्मिती व व्यक्तीमत्व विकास या विषयावर माहिती मिळविणे आणि सातव्या दिवशी मनोगतात्मक समारोप करणे असे नियोजन आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष कला वर्गातील विद्यार्थिनी नाजमीन पठाण हिने केले. उद्घाटन समारंभाच्या सत्राचे आभार प्रदर्शन प्रथम वर्ष कला वर्गातील विद्यार्थिनी वैष्णवी महाजन हिने केले. या उद्घाटन सत्राच्या समारंभाचे सर्व आयोजन नियोजन प्रा. किशोर पाटील यांनी सांभाळले. कार्यक्रमाला ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
