जागतिक महिलादिनी शिवरथ प्रतिष्ठान तर्फे रक्तगट तपासणी शिबीर संपन्न

भाग्यलक्ष्मी रक्तपेढीचे डॉ. महेंद्र साळुंखे व त्यांचे सहकारी यांचे लाभले सहकार्य

अमळनेर : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून शिवरथ प्रतिष्ठान, अमळनेेर यांच्यातर्फे बुधवार, दिनांक ८ मार्च रोजी ८५/ ब ‘ शिवनेरी’ प्रतापमिल कंपाउंड येथे रक्त गट तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील व उपस्थित महिलांच्या शुभहस्ते आईसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सौ.युगछाया शिंगाणे यांनी जिजाऊ वंदना गायिली. यावेळी शिवश्री बापूसाहेब प्रा.अशोक पवार, शिवश्री संजय सूर्यवंशी, शिवरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवश्री बापुराव ठाकरे, सचिव शिवमती पुनम ठाकरे, शिवमती सुरेखा खैरनार आदी उपस्थित होते. शिवमती पुनम ठाकरे यांनी शिबिराच्या उद्घाटक सौ.जयश्री पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

रुग्णाला शरीरातील घटकांचे प्रमाण कळावे व वेळीच उपचार करता यावा या उद्देशाने हे रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तगट तपासणी शिबिरावेळी अनेक महिला व पुरुषांचे रक्तगट, हिमोग्लोबीनचे प्रमाण, रक्तदाब, मधुमेह (डायबेटिस), थायरॉईड, किडनीचे विकार, चरबीचे प्रमाण आदी तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले. दुपारी ३ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरासाठी परिसरातील अनेक महिला व नागरिक यांची उपस्थिती होती. यावेळी शिवश्री नानासाहेब मनोहर निकम, शिवश्री प्रा.अशोक पवार, शिवश्री संजय सूर्यवंशी, शिवश्री रविंद्र जैन, शिवश्री विजय पाटील, आबासाहेब देवरे, राजूभाऊ, शिवश्री प्रदिप शिंगाणे, सौ.युगछाया शिंगाणे, सौ.नम्रता पाटील, सौ.स्मिता महेंद्र निकम, सौ.सुरेखा खैरनार, सौ.सपना पहाडे, सौ.साधना जैन, सौ.रेखा ठाकूर, सौ.लिनाताई पाटील, सौ.संध्या पाटील, सौ.ललिता पाटील, सौ.शितल पाटील, सौ.शितल मनोरे, सौ.धनगर मॅडम आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सर्व रक्तदात्यांना चहा, बिस्किटे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवरथ प्रतिष्ठानचे शिवश्री बापूराव ठाकरे, सौ.पुनम ठाकरे यांनी परिश्रम घेतले. मराठा सेवा संघ, प्रतापनगर परिसरातील रहिवाशी तसेच पैलाड येथील भाग्यलक्ष्मी रक्तपेढीचे डॉ. महेंद्र साळुंखे व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!