अमळनेर : येथे सामाजिक पातळीवर साजरी होणारी होळी म्हणजे आदिवासी ठाकूरांची परंपरागत होळी. यंदा महिलांच्या हस्ते होळी पूजन व अग्नि देत पारंपरिक पद्धतीने ठाकुर समाजाचा शिमगा उत्सव साजरा करण्यात आला. अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या श्रीराम कॉलनी परिसरातील शेतात वर्षानुवर्षे ठाकूर जमात बांधव होळी साजरी करीत असतात. यंदाच्या या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ठाकूर समाजातील सुवासिनींच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. पारंपरिक पद्धतीने होळी रचण्यात आली होती. या होळीचा दांडा उंबर झाडाची फांदी उभी करून त्यास पायाशी खोदलेल्या खड्ड्यात गोवऱ्या ठेवल्या जातात.
ओल्या झाडांची तोड न करता सामूहिक वर्गणीतून कोरडी लाकडे आणि गोवऱ्या यासह होळीचे पूजा, सजावट साहित्य सामाजिक दातृत्वातून गोळा केले जाते. यावेळी होळीला रंगेबिरंगी पताका, फुगे लावून सजविण्यात आले होते. ठाकूर जमातीचे अमळनेर प्रमुख दिलीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, दिलिप वानखेडे, गुणवंत वाघ, शेखर ठाकूर, अनिल ठाकूर आदिंनी होळीला पुष्पहार, हारडा, हार कंगन अर्पण करून पूजन केले. होळीला उपस्थित महिला मंडळाच्या पदाधिकारी सौ.अपेक्षा पवार, सौ.मिना ठाकूर, सौ.रेखा ठाकूर, सौ.स्वाती ठाकुर, सौ मंगल ठाकूर, स्वप्ना ठाकूर, पूनम ठाकूर, कल्याणी सूर्यवंशी, आदिती ठाकूर आदिंनी विधिवत अग्नि देऊन ‘ होळी रे होळी’ च्या जल्लोषात होळीला नैवेद्य अर्पण करून होळी पेटवली. होळीच्या अग्नीभोवती उत्साही वातावरणात फेर धरण्यात आला.
याप्रसंगी रविंद्र वानखेडे, प्रकाश ठाकूर, विजय ठाकूर, सुखदेव ठाकूर, निलेश वाघ, उमेश ठाकूर, यशवंत सूर्यवंशी, उमाकांत ठाकूर, सुरेश ठाकूर, दिपक ठाकूर, किरण सूर्यवंशी, गजानन ठाकूर, हिम्मत ठाकूर, रमेश ठाकूर, भूषण ठाकूर, विवेक सूर्यवंशी, जयेश ठाकूर आदिंसह मोठ्या संख्येने ठाकूर समाजाचे लोक उपस्थित होते. पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याच्या परंपरेत होळीचा मुख्य सण शहरी वातावरणात जोपासण्याचा प्रयत्न ठाकूरांच्या सामूहिक होळीतून अमळनेर येथे सातत्याने होत असतो. याप्रसंगी होळीचा प्रसाद म्हणून गुळाची जिलेबी सर्वांना वाटण्यात आली.