कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेेर चे प्रवेशद्वार आता ‘बळीराजा प्रवेशद्वार’ म्हणून जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचा बाजार समिती तर्फे केला सत्कार

अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वारावर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांना बळीराजाची प्रतिमा भेट देत बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पाटील, समाधान धनगर यांचे सह संचालक मंडळाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करुन पारंपारिक वाद्यांवर नृत्य सादर करत लक्ष वेधून घेतले होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वाराचे ‘बळीराजा प्रवेशद्वार’ नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानिमित्ताने बाजार समितीचा कायापालट करण्यात आला आहे. बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात येऊन कार्यालयाचे रंगकाम व सुशोभीकरण करुन परिसर स्वच्छ करण्यात आला होता. प्रवेशद्वाराचे नामकरण प्रसंगी सोबत माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, आ.अनिल पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणी खडसे उपस्थित होते.

याप्रसंगी बाजार समितीचे संचालक डॉ अनिल शिंदे, डॉ.अशोक पाटील, समाधान धनगर, प्रा. सुभाष पाटील, भोजमल पाटील, सौ. पुष्पा पाटील,सौ. सुषमा देसले, भाईदास अहिरे, व्यापारी असोसिएशनचे हरी भिका वाणी, रमेश छाजेड, संचालक प्रकाश वाणी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील आदींनीही एकत्रित पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तर राज्याचे विरोधी पक्षनेते ना.अजित पवार , माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीष पाटील, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचेसह मान्यवरांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गाडी थांबवून पदाधिकारी यांचेशी चर्चा करून धावती भेट दिली. यावेळी मान्यवर नेत्यांचे स्वागत व सत्कार उपस्थित बाजार समितीचे कर्मचारी, संचालक मंडळ, हमाल मापाडी कामगार संघटना, खरेदीदार व्यापारी असोसिएशन, आडत असोसिएशन, गुमास्ता कामगार संघटना यांचे पदाधिकाऱ्यांसह समितीचे सचिव डॉ.उन्मेष राठोड, सुनिल सोनवणे, अशोक वाघ, योगेश महाजन, गणेश पाटील, धिरज ब्रह्मे, निलेश पाटील, प्रशांत राणे, योगेश इंगळे, बापू पाटील, प्रशांत पाटील, सुरेश शिरसाठ, आबा गोसावी यांचेसह उपस्थित मान्यवरांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!