संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश संघटक पदी अमळनेरचे श्याम जयवंतराव पाटील यांची नियुक्ती

अमळनेर : येथील नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते श्याम जयवंतराव पाटील यांची नुकतीच संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड, प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांचे नेतृत्वाखाली नुकतीच संभाजी ब्रिगेडच्या नवीन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. यात अमळनेेर चे श्याम पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संघटक म्हणून नियुक्तीचे पत्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड, प्रदेश महासचिव सुभाष बोरकर व पदाधिकारी यांचे हस्ते देण्यात आले आहे.

गेली अनेक वर्ष श्याम पाटील हे संभाजी ब्रिगेडचे उत्तम कार्य करीत आहेत. त्यांचे या कार्याची दखल घेत त्यांचेवर महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यापुढेही ते जोमाने कार्य करुन संघटनेचा नावलौकिक वाढवतील यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. श्याम पाटील यांच्या निवडीचे पुरोगामी परिवर्तनवादी संघटना यांनी स्वागत केले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन व शुभेच्छा..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!