
अमळनेर : शहरात दिनांक ०३ व ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वसामान्य शेतकरी, महिला, कष्टकरी, दलित, आदिवासी, ओबीसी अशा एकूणच बहुजन समाजाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला मुक्त विचारपीठ उपलब्ध करून देणारे विद्रोही साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाचे एकूण स्वरूप समजावून घेऊन त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक आज शनिवार, दि.१५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता “यशवंत सभागृह” धनदाई महाविद्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी- पुणे, राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले- धुळे, उपाध्यक्ष अर्जुन बागुल- नाशिक, पदाधिकारी डॉ. मारोती कसाब- लातूर, अहमद भाई सरवर, शाहीर अंकुश सिंदगीकर, डॉ. व्यंकट सुर्यवंशी- उदगीर, आर टी गावीत- नंदूरबार, मन्साराम पवार, सुभाष काकुस्ते- धुळे हे उपस्थित राहणार आहेत. हे साहित्य संमेलन सर्वांचे सहकार्य व श्रमातून आकार घेणार असल्याने साहित्यप्रेमींनी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन विद्रोही साहित्य समिती च्या वतीने करण्यात आले आहे.