शिष्यवृत्ती परीक्षेत पिंगळवाडे जि.प.उच्च प्राथ. शाळेचा विद्यार्थी प्रदीप पारधी गुणवत्ता यादीत

अमळनेर तालुक्यातून जि.प.शाळेतील एकमेव विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

अमळनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतिम निकाल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्यांसह दिनांक १३ जुलै २०२३ रोजी सायं. ६:०० वा. परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पाचवीच्या परीक्षेत २२.३११५ टक्के विद्यार्थी आणि आठवीच्या परीक्षेत १५.६०४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात, अमळनेर तालुक्यातील जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेतील विद्यार्थी प्रदिप उदेभान पारधी याने जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित करुन घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे प्रदीप पारधी हा इ.५ वी शिष्यवृत्ती परिक्षेत अमळनेर तालुक्यातून जि.प.शाळेतील एकमेव विद्यार्थी म्हणून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. प्रदिप हा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कल्पना पारधी यांचा सुपूत्र असून त्याला वर्गशिक्षक दत्तात्रय सोनवणे, मुख्याध्यपिका वंदना ठेंग, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रदीप च्या या यशाबद्दल तालुक्याचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.धनगर, कविता सुर्वे व रावसाहेब पाटील, शापोआ अधिक्षक भुपेंद्र पाटील, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, निवृत्त प्रांताधिकारी भागवत सैंदाणे, निवृत्त उपअभियंता डी.पी.पाटील, पिंगळवाडे गावच्या सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, ग्रा.पं.सदस्य देविदास देशमुख, समाधान पारधी, कमलबाई पाटील, ज्योतीबाई पारधी, ग्रामसेवक विलास पाटील, तलाठी स्वप्निल कुलकर्णी, पोलिस पाटील गजेंद्र पाटील, शा.व्य.समिती अध्यक्षा कल्पना पारधी, उपाध्यक्ष समाधान पाटील, सर्व शा.व्य.समिती सदस्य, तसेच श्रीक्षेत्र पिंगळवाडे येथील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व तालुक्यातील शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे. प्रदीप पारधी याची इ.५ वी पुर्व उच्च प्राथमिक (PUP) शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!