गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून एकमेव विद्यार्थी; ग्रामीण विभागात जळगाव जिल्हातून प्रथम

अमळनेर : तालुक्यातील नांद्री येथील रहिवासी तथा मंगरूळ ता. अमळनेर सेंटमेरी इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेचा विद्यार्थी चि. प्रसन्न हिंमत चौधरी हा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा (PSS) २०२३ मध्ये ग्रामीण विभागातून महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत २० वा तर जळगाव जिल्हातून प्रथम आला आहे. विशेष म्हणजे तो राज्याच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून एकमेव आहे. चि. प्रसन्न हा जि.प. उच्च प्राथमिक शाळा, खवशी चे मुख्याध्यापक हिंमत ओंकार चौधरी व प्राथमिक शाळा, मंगरूळ च्या सहशिक्षिका सौ. निलम हिंमत चौधरी यांचा मुलगा आहे.
इयत्ता ८ वी नवोदय प्रवेश परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्याची इयत्ता ९ वी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्याला या यशासाठी शाळेच्या प्राचार्या, शिक्षकवृंद, मोराणकर सर, ज्ञानदीप क्लासेसचे संचालक ज्ञानेश्वर सांळुखे, आई, वडील व दिदी डॉ.सिद्धि चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मा.आ. शिरीष चौधरी, मा.प्रा.डॉ. सुभाष महाजन, कर्तव्य बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. धनगर, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंखे, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक सदानंद भावसार, विविध मान्यवर, आप्तेष्ट, शाळेच्या प्राचार्या, शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!