
अमळनेर : विविध क्षेत्रात तालुक्यातील युवकांनी स्व कष्टाने आपल्या कार्यकुशलतेची व बुद्धीमत्तेची पताका फडकवली आहे. यामुळे खान्देशवासीयांची मान उंचावली आहे. उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुक्यातील विविध विकास मंच तर्फे शनिवारी (ता.२२) सकाळी साडे आठला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात खान्देशातील अशा कर्तृत्ववान रत्नांचा महासन्मान पार पडणार आहे. नागपूर आयकर विभागाचे आयुक्त संदीपकुमार साळुंखे व मुंबई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान केला जाणार आहे. यावेळी तालुक्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी स्वर्गीय महेश पन्नालाल थोरात यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘फिरते वाचनालय’ चा शुभारंभ तसेच येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे ‘चला व्यक्तिमत्व विकास घडवूया’ या उपक्रमाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात, नाशिक जीएसटी विभागाचे उपायुक्त मधुकर पाटील, प्रांताधिकारी महादेव खेडकर, पोलीस उपाधीक्षक सुनील नंदवाळकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय भदाणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ एस. आर. चौधरी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन उत्कर्ष खानदेशी अधिकारी ग्रुप चे समन्वयक तथा नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील यांनी केले आहे. अमळनेर तालुक्यातील जे युवक, युवती विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन विविध पदांवर निवड झाली असेल अशांनी उमेश काटे (९४२३५७९८२७) व महेंद्र पाटील (९७६४२६५८६६) यांच्याकडे नावे नोंदवावीत असेही आयोजकांनी कळविले आहे.