जिल्हास्तरावर निवड : २३ शाळांमधील ४६ विद्यार्थी सहभागी
अमळनेर : आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य व महत्व शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच मिळावे तसेच G-20 शिखर परिषदेची माहिती मिळावी, यासाठी राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये “G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धा” हा उपक्रम राबविण्यात आला. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थिनींचा गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, केंद्रप्रमुख शरद सोनवणे, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, साने गुरुजी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे, विषय तज्ञ किशोर पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तालुकास्तरीय G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने अव्वल क्रमांक मिळविला असून विद्यालयाची विद्यार्थिनी कनिष्का देवानंद पाटील प्रथम आली आहे. पिंपळे बुद्रुक येथील कै. सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जागृती पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळविला. साने गुरुजी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा कापडणीस व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या किरण पाटील या दोघांनी तृतीय क्रमांक मिळविला. कनिष्का पाटील व जागृती पाटील या दोघांची जिल्हास्तरीय G-20 प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळत आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावर जाण्याचे आवाहन केले. यावेळी कविता सुर्वे, संदीप घोरपडे, शरद सोनवणे, अनिता बोरसे व उमेश काटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दिव्या पाटील या विद्यार्थिनींनीने मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून देवेंद्र पाटील, मनीष उघडे व डी. ए. धनगर यांनी काम पाहिले. माध्यमिक शिक्षक मनीष उघडे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शिलाताई पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रा. श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, प्राचार्य गायत्री भदाणे, मुख्याध्यापक ए. ए. देसले यांनी अभिनंदन केले आहे.