विविध मागण्यांसाठी धनगर समाजाचे अमळनेेर येथे आसूड आंदोलन

धनगर समाजाच्या भावनांचा अंत न पाहता एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मुख्य मागणी

अमळनेर : महाराष्ट्रातील धनगर समाजाची अनुसूचित गणना होत आहे परंतु शब्दच्छल करून शासन जाणीवपूर्वक धनगर समाजाचा घटनादत्त अधिकार डावलण्याचा प्रयत्न करीत आहे. तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सन २०१४ मध्ये बारामतीत झालेल्या सभेत धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणीचे वचन दिले होते. भाजप सरकार सत्तेवर येऊन नऊ वर्ष झालेत तरीसुद्धा आजपावतो धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी झाली नसल्याने धनगर समाजात मोठा असंतोष आहे. तरी धनगर समाजाच्या भावनांचा अंत न पाहता एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी. अन्यथा.. धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

यशवंत सेनेचे पदाधिकारी गेल्या ६ सप्टेंबर २०२३ पासून चौंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसले आहेत. राज्यकर्त्यांनी अजून तरी ठोस भूमिका घेतलेली नाही. तरी गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या मल्हार सैनिकांशी राज्यकर्त्यांनी यथोचित समाज हिताची चर्चा करावी व धनगर समाजाला न्याय द्यावा. तसेच सोलापूर येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळल्याने धनगर बांधवांना मारहाण करण्यात आली. या मारहाण करणाऱ्या दोषींवर शासनाने त्वरित कार्यवाही करावी व धनगर समाजातील होतकरू गरीब बांधवांना न्याय द्यावा आदी मागण्यांसाठी धनगर समाजाने आसूड आंदोलन पुकारले. याबाबत मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी धनगर समाजातील मच्छिंद्र लांडगे, डी.ए. धनगर, बन्सिलाल भागवत, नितीन निळे, गोपाल हडपे, आनंदा धनगर, सुरेश न्हाळदे, समाधान धनगर, एस.सी. तेले, दशरथ लांडगे, हरचंद लांडगे, जिभाऊ कंखरे, भगवान धनगर, आलेश धनगर, अनिल धनगर, मुकेश लांडगे, राजेंद्र शिरसाठ, संजय शिरसाठ, एस.एच. धनगर, प्रितम रत्नपारखी, निखील धनगर, रामचंद्र धनगर, दीपक धनगर, विलास लांडगे, रमेश धनगर, बाळू धनगर, तुषार धनगर, उमेश मनोरे, विजय हिवरे, प्रभाकर लांडगे, सुधाकर पवार, शशिकांत आढावे, पंडीत लांडगे, बाळू नाना भागवत आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!