जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २४ सप्टेंबरला होणार सन्मान

अमळनेर : देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल शाळेतील शिक्षक ईश्वर रामदास महाजन यांना जळगांव जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. ईश्वर महाजन यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस सागर हिवराळे यांनी एका पत्रकाद्वारे निवड करून त्यांना निवडीचे पत्र पाठवले आहे. दिनांक २४ सप्टेंबर रोजी नॅशनल हायवे वरील मंगलमय हॉल, कलिंगा माता मंदिराजवळ, टाटा मोटर्स शेजारी जळगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये गेल्या २१ वर्षांपासून ईश्वर महाजन ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील व शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थी गुणवत्ता वाढ, वक्तृत्व विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करणे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड, माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, ,महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे अमळनेर तालुका अध्यक्ष जयवंतराव वानखेडे व संघटनेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार पाटील, गणित मंडळाचे समन्वयक डी. ए. धनगर, विज्ञान मंडळाचे समन्वयक डी. के. पाटील, निरंजन पेंढारे, साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळ, अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे व कार्यकारणी सदस्य, शिवशाही फाउंडेशन चे जयेश काटे व उमेश काटे, साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंखे, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा दशरथ लांडगे, ब्राह्मणे ता.अमळनेर येथील पोलीस पाटील व विकास सोसायटीचे चेअरमन गणेश भामरे, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन !