जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या जवानांचा सन्मान

अमळनेर : तालुक्यातील जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भारतीय सैन्यदलात विविध पदांवर निवड झालेल्या जवानांचा तसेच मंत्रालयात कर सहाय्यक पदावर निवड झालेल्या कु. दामिनी यांना सन्मानचिन्ह व वाचनीय पुस्तके देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमळनेर येथील मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पीएसआय नरसिंग वाघ, जानवे गावचे सरपंच वकील बाबा, उपसरपंच गोपाल पाटील, माजी सरपंच शिवाजी जुलाल पाटील, नवल आनंदा पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष डी. एम. पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय सैन्यदलात सी.आर.पी.एफ., बी.एस.एफ, सी.आय.एस.एफ, एम.एस.एफ अशा विविध पदांवर नऊ जवानांची व टॅक्स असिस्टंट पदावर कुमारी दामिनी हिची निवड झाल्याबद्दल हा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृष्णा रामदास पाटील, अनिल मधुकर पाटील, शरद शेनपडू पाटील , बाळू पेंटर, वाचनालयाचे कर्मचारी एकनाथ बोरसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले. गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!