रांजणगाव येथील हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना केले सायकलींचे वाटप

चाळीसगाव : येथील रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम यांच्यातर्फे काल दिनांक २० सप्टेंबर रोजी हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालय रांजणगाव येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयातील ६३ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रा.स.शि.प्र.मंडळाचे चिटणीस प्रा. बाळासाहेब विश्वासराव चव्हाण होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दुय्यम चिटणीस रावसाहेब जयवंतराव साळुंखे, आर्किटेक्ट धनंजय यशवंतराव चव्हाण, एडवोकेट साहेबराव भिकनराव पाटील, भाऊसाहेब महारु पाटील, सुनील बबनराव देशमुख, महेश दिनकरराव चव्हाण व रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगावचे झोन क्रमांक ९ चे गव्हर्नर रविंद्र शिरुडे, अध्यक्षा भाग्यश्री शिनकर, सौ. स्मिता करमरकर, माजी जि. प. सदस्य जिभाऊ आधार पाटील, रांजणगाव सरपंच प्रमोद वसंतराव चव्हाण, खेर्डे चे धनराज पुंडलिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन विद्यालयातर्फे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव यांच्यातर्फे विद्यालयातील ६३ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. बाळासाहेब चव्हाण यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. श्रीमती स्मिता करमरकर यांनी विद्यार्थ्यांना सूचना केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक दिपक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती दिपाली पाटील यांनी तर आभार अमृतकार सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.