अमळनेर : येथील आर. के. नगर मधील रहिवासी रमेश हिरामण चौधरी यांचे दिनांक २६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ७२ वर्षांचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. अमळनेर येथील आर.के.पटेल टोबॅको प्रोसेसर्स प्रा.लि. या कंपनीत त्यांनी निवृत होईपर्यंत तीन दशकांहून अधिक काळ सेवा केली. सेवा काळात कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. प्रताप महाविद्यालयाचे कार्यालयीन कर्मचारी भटू चौधरी, दिपक चौधरी, दिनेश चौधरी यांचे ते वडील होत. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक २७ रोजी सकाळी ९.३० वाजता आर.के.नगर (दत्त मंदिर ) येथील त्यांचे राहत्या घरापासून निघेल. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !