उद्योगपती मनोहर पाटील यांच्याकडून शाळेला प्रिंटर भेट
पारोळा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाहुटे येथे बुधवार दिनांक २७ रोजी सार्वे केंद्रातील ३ री शिक्षण परिषद अतिशय गुणवत्तापूर्ण व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. या
परिषदेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाहुटे व जि. प. प्राथमिक शाळा बाभळेनाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. रिधम मनोरे, दिव्या पाटील, सोनल पाटील, हेमांगी पाटील, मयुरी पाटील, तृप्ती पाटील या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत उत्तमरित्या सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शालेय पोषण आहार अधिक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी सी.एम.चौधरी, केंद्रप्रमुख सार्वे संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमात बाहुटे येथील अहमदाबाद, गुजरात येथे स्थायिक असलेले उद्योगपती मनोहर पंडित पाटील यांच्याकडून रु.२३ हजार किंमतीचा एचपी कंपनीचा प्रिंटर शाळेला भेट देण्यात आला. तसेच आयोजकांतर्फे सर्व शाळांना उपयुक्त शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. यावेळी अपेक्षित सर्वच विषयांवर चर्चा व मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शाळा, बाभळेनाग चे मुख्याध्यापक अरूण पाटील यांनी केले. सुत्रसंचालन नंदकिशोर जाधव यांनी तर आभार किरण पगारे यांनी मानले. शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु भगिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाहुटे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र मनोरे, उपशिक्षक गोरख पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष जयवंत पाटील, सरपंच अरूण पाटील, उपसरपंच भास्कर पाटील, किरण देसले, श्रीमती मायाबाई पाटील, सौ.बेबाबाई कोळी, सौ. आशाबाई पाटील आदींनी परिश्रम घेतले.