देशाला महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज : बन्सीलाल भागवत

अल्लामा फज़ले हक़ खैराबादी ग्रंथालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री संयुक्त जयंती कार्यक्रम संपन्न

अमळनेर : देशालाच नव्हे तर जगाला आज महात्मा गांधीजींच्या विचारांचं आकर्षण असून ती गरज आहे. द्वेषाने द्वेष च वाढतो, गांधीजींच्या ऐवजी जर नथुराम गोडसे च्या प्रतिमेची मिरवणूक काढली जात असेल तर यापेक्षा दुर्दैव काय ? असा संतप्त सवाल काँग्रेस सेवा दलाचे बन्सीलाल भागवत यांनी केला. शहरातील अल्लामा फज़ले हक़ खैराबादी ग्रंथालयाचे मौलाना रियाज शेख यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री संयुक्त जयंतीचा कार्यक्रम नुकताच साजरा केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बन्सीलाल भागवत बोलत होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा सुभाष (जिभाऊ) पाटील, सुभाष अण्णा चौधरी, धनगर अण्णा पाटील, प्रा. के. डी. पाटील, सुलोचना वाघ, वसुंधरा लांडगे यांनीही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौतम मोरे यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांपैकी एक होते. किंबहुना, त्यांनीच ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व केले. गांधी हे कायद्याचे विद्यार्थी होते असूनही त्यांनी आपला व्यवसाय सोडला आणि आपल्या राष्ट्रासाठी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, “डोळ्याच्या बदल्यात डोळा संपूर्ण जगाला आंधळा बनवेल.” त्यांनी अहिंसेचे पालन केले. हिंसा हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर नाही असा त्यांचा विश्वास होता. “तुम्ही जगात पाहू इच्छित असा बदल व्हा” आणि त्यांनी आपल्या जीवनात तेच केले. तो एक बदल होता. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अथक लढा दिला आणि प्रसंगी आपले जीवन पणाला लावले. त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले. ज्यामुळे त्यांना अनेकदा अटक झाली. प्रचंड हाल सहन करून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरोधात जाऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

भाषणे झाल्यावर शेवटी सर्व उपस्थितांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील, संचालक प्रा. सुभाष पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, माजी पं. स. सभापती धनगर पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, महिला काँग्रेस शहराध्यक्ष प्रा. नयना पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. तिलोत्तमा पाटील, अर्बन बँक संचालक वसुंधरा लांडगे, अॅड हेमंत भांडारकर, पत्रकार रवी मोरे , गौतम मोरे , संतोष पाटील , महेश पाटील, योगेश देसले, मुकतार खाटीक, निळकंठ दादा, इमरान खाटीक, पन्नालाल मावळे, रहीम मिस्तरी, इकबाल शेख साहाब, हाजी ताहेर शेख, जहुर मुतवल्ली, हाजी के बी शेख साहाब, पप्पू खाटीक, अ.कादीर, राजू शेख, लियाकत, अ.वाहेद, नवाज़ आदि उपस्थित होते

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!