जीवनाच्या स्पर्धेत खेळाडू वृत्ती जोपासा : बिडीओ एस. टी. सोनवणे
अमळनेर : जीवनाच्या स्पर्धेतही खेळाडू वृत्ती जोपासली तर जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही यासाठी शेवटपर्यंत खेळाडू वृत्ती अंगी बाळगा असे आवाहन गट विकास अधिकारी एस. टी. सोनवणे (शिरपूर) यांनी केले. माजी नगराध्यक्ष स्व.भास्करराव तापीराम चव्हाण यांच्या २३ व्या स्मृतिप्रित्यर्थ प्रा.डॉ.एस.ओ.माळी आणि प्रतापियन्स परिवारातर्फे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. एस. ओ. माळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी तज्ञ संचालक डी. ए. धनगर, शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, प्रतापियन्स प्रेरणा प्रबोधिनीचे संचालक उमेश काटे आदी उपस्थित होते. दरम्यान सकाळी जी.एस हायस्कूल मध्ये खानदेश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष हरी भिका वाणी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी खो-खो, कबड्डी, १०० मीटर धावणे, रस्सीखेच, टेनिक्वांईट आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तालुका क्रीडा संयोजक एस. पी. वाघ, क्रीडा शिक्षक के. आर. बाविस्कर, पी. आर. भावसार यांनी पंच म्हणून काम केले. सुनील वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
विविध क्रीडा स्पर्धेचा निकाल….
१०० मी धावणे : प्रथम- मुकेश बाविस्कर, व्दितीय- कृष्णा महाजन, तृतीय- रक्षक गोसावी, उत्तेजनार्थ- यश बडगुजर.
रिंग टेनिस : प्रथम- रेहान जाकिर शेख, व्दितीय- मेहुल चौधरी, तृतीय- नरेश सोनवणे, उत्तेजनार्थ- अमोल अहिरे.
रस्सीखेच (मोठा गट) : प्रथम- गितेश बाविस्कर, व्दितीय- गौरव महाजन, तृतीय- शुभम वारुळे.
रस्सीखेच (लहान गट) : प्रथम- हितेश पाटिल, व्दितीय- नैतिक सोनार, तृतीय-प्रिन्स पवार.
कबड्डी : प्रथम- फ्रेड्स कबड्डी क्लब कर्णधार (जयेश पाटील), व्दितीय- जी. एस. क्रीडा प्रबोधनी (कर्णधार- दिनेश पाटील), तृतीय- जी. एस. हायस्कुल (कर्णधार यश पाटील)
खो खो : प्रथम- जी. एस. क्रीडा प्रबोधनी, व्दितीय- प्रताप काॅलेज,अमळनेर, तृतीय- जी. एस. हायस्कुल, अमळनेर
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू : गिरीश रौंदळे (खो खो), दिनेश पाटील (कबड्डी), रेहान शेख (रिंग टेनिस) तसेच सचिन पावरा यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.