
अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील यांच्या मान्यतेनुसार तसेच ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. उमेश दादा पाटील यांच्या आदेशानुसार प्रदेश उपाध्यक्ष तसेच मा.आ. डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते अमळनेर तालुका ग्रंथालय विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी जानवे येथील डी. एम. पाटील सर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रविंद्र जाधव उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष पदी रणाईचे येथील हेमंत पाटील सर यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी किशोर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. डी. एम. पाटील हे अमळनेर तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष व साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, जानवे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या निवडीबद्दल ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक सौ. रिता ताई बावीस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ. तिलोत्तमा ताई पाटील, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील, डॉ. किरण दादा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
