जन्मदिनाचे औचित्य साधत युवा उद्योजक भिकेशभाऊ पावबा पाटील यांना सामाजिक कार्याबद्दल मराठी लाईव्ह न्युजचा पुरस्कार प्रदान

अमळनेर : येथील पंचायत समितीचे उपसभापती तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस युवा उद्योजक भिकेशभाऊ पावबा पाटील यांना जन्मदिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्याबद्दल आज दिनांक १२ डिसेंबर रोजी मराठी लाईव्ह न्युजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी लाईव्ह न्युजचे मुख्य संपादक ईश्वर महाजन, उपसंपादक सोपान भवरे, दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अमोल माळी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना भिकेश पाटील म्हणाले की, लक्ष्मीपूजनाचे दिवशी एका चांगल्या कार्यक्रमाला मी मुकलो यांची खंत आहेच. तथापि, माझ्या जन्मदिनाचे औचित्य साधत घरी येऊन पुरस्काराने सन्मानित केले याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो.मला मिळालेल्या पुरस्काराने मला चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

कोरोना काळात त्यांनी तळागाळातील उपेक्षित लोकांना मदतीचा हात देत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ‘एक घर, एक झाड’ हा उपक्रम राबवून तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करुन झाडे जगवली आहेत. कमी वयात त्यांनी विविध पदे भूषविलेली आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची मराठी लाईव्ह न्युजने दखल घेतली होती. मराठी लाईव्ह न्युजच्या चौथ्या वर्धापनदिनी ‘सत्कार कर्तृत्वाचा’ या कार्यक्रमात त्यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येणार होता. तथापि काही कारणास्तव ते बाहेरगावी असल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते. आज दिनांक १२ डिसेंबर रोजी साजरा होणारा त्यांचा जन्मदिवस सामाजिक पुरस्काराने होणं हा दुग्धशर्करा योग म्हणायला हरकत नाही.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!