राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी केले स्पर्धेचे आयोजन

अमळनेर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी अमळनेरात खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गलवाडे रोडवर ग्लोबल इंग्लिश स्कूल जवळील मैदानात दिनांक १६ डिसेंबर रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जेष्ठ नेत्या सौ. तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उन्मेष पाटील, प्रदेश समन्वयक सौ. रिता बाविस्कर, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दयाराम पाटील, कमलबाई पाटील, डॉ. किरण पाटील, अरुण शिंदे, लतीब मिस्तरी, रफिक शेख, सतीश देशमुख आदी उपस्थित होते.

कबड्डी स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन एकूण ३५ संघ सहभागी झाले होते. यात शहरी व ग्रामीण भागातील शाळा तसेच चाळीसगाव, भडगाव, पारोळा, धुळे, शिंदखेडा येथील संघांचाही सहभाग होता. प्रत्येक संघाने अतिशय रोमांचक कामगिरी दाखविली. डी. बी. बहिरम यांनी उत्तम समालोचन करत स्पर्धेतील रंगत वाढविली. कोच व परिक्षक म्हणून सुनील वाघ, अनिरुद्ध शिसोदे, मिलिंद पाटील, जे. व्ही. बाविस्कर व क्रीडा शिक्षकांनी काम पाहिले. स्पर्धा पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरु होती. शिवनेरी क्लब, मोहाडी धुळे यांनी अंतिम सामना जिंकून विजय मिळवल्याने ते प्रथम विजयाचे मानकरी ठरले. उपविजेता म्हणून फ्रेंड्स क्लब- मारवड तर तृतीय विजेता म्हणून अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशन अमळनेर यांना घोषित करण्यात आले.
स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील केले होते. नियोजनाची जबाबदारी अनिरुद्ध शिसोदे, सचिन वाघ, सनी गायकवाड, शुभम पवार, राहुल पाटील, कल्पेश पाटील, उज्वल मोरे, ललित पाटील, गौरव पाटील, हितेश पाटील, नितेश परब, साहील टकारी, रविकांत कोळी, विवेक बागळे यांनी पार पाडली.