
अमळनेर : येथील प्रताप मिल परिसरात गोकुळधाम सोसायटी मधील सांडपाण्यामुळे नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करुनही फारशी दखल घेतली जात नाही. दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर २०२२ रोजी नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. आजतागायत दखल न घेतल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा ईशारा दिला आहे. यासंदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी यांना आज दिनांक १८ जानेवारी रोजी पुन्हा लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी साहेब जळगाव, उपविभागीय अधिकारी अमळनेर यांनाही सादर करण्यात आलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रतापनगर भागातील गोकुळधाम सोसायटी मधील सांडपाणी गलवाडे रोड लगत असलेल्या गटारीत सोडले जाते. सदर सांडपाणी हे पुढे न जाता प्रताप नगरच्या जुन्या वस्तीत माघारी परत येते. सदर पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त आहे तथा सदर पाणी वर्षभरापासून तुंबलेले आहे. वस्तीतील जुन्या इमारतीमध्ये पसरत आहे. त्यामुळे असणारी घरे केव्हाही कोसळू शकतात. रोगराई पसरत आहे. आपण तथा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भरपूर वेळेस या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तरी आता नागरिकांच्या संयमाचा अंत आपण पाहत आहात. शहरात राज्यस्तरीय साहित्य संमेलन समारंभ साजरा करण्यासाठी शहरात भरपूर अनावश्यक खर्च केला जात आहे. उच्चभ्रू वस्तीला सुंदर करण्याचा अवास्तव खर्च नगरपरिषद करत आहे तथा आम्हास जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत आहात. यामुळे दिनांक २६ जानेवारी पासून आम्ही आंदोलनास सुरुवात करणार आहोत. अमळनेर शहरात येणारे लोकप्रतिनिधी, मान्यवर यांना देखील या अडचणीचे अवलोकन होईल अशी आमची आंदोलनाची दिशा असेल याची आपण नोंद घ्यावी.
निवेदनावर दीपक चौगुले, राजू कायली अक्षय पुकळे, विकास पुकळे, गफ्फार शेख, नवाब शेख, श्रीमती मनिषा परब, पद्मावती परब, सलीम शेख, शेख जाकीर रशिद, मुन्शी शेख, शरीफोद्दीन शेख, आयुब सय्यद, साजिद शेख, सलमान खान, अफसर शेख, जुबेर शेख, जावेद खान, रोहन शेख, इब्राहिम खान, जावेद मलिक, लियाकत सैय्यद, रहीम शेख, शेख गप्पार शेख रुस्तम मेहमूद अली, शेख रहीम, इस्ताक शेख, शेख करीम, शेख भुरा, खान सबाम महेबुब, मझहर खान, समीर शेख अशपाक, फारुक बागवान, शोएब खान गुलाम हुसेन, समद भाई, रियाज भाई, शैख जाकीर युसूफ आदी नागरिकांच्या सह्या आहेत.