अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना कलाप्रेमी तसेच साहित्य रसिकांची लक्षणीय हजेरी

अमळनेर (साने गुरुजी साहित्य नगरी) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अमळनेर येथे २ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम २९ जानेवारीपासून आयोजित करण्यात आले होते. याचा ३१ जानेवारी रोजी समारोप करण्यात आला. पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांस आर्या शेंदुर्णीकर (जळगाव) च्या कथ्थक नृत्याने बहारदार सुरुवात केली. साहित्य संमेलनात संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची लक्षणीय हजेरी होती.

जळगावच्या तेजल जगताप याने एकल तबला वादन सादर केले. सुनील वाघ व सहकाऱ्यांनी ‌‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम सादर केला. दुसऱ्या दिवशी ३० जानेवारी रोजी ‌‘आमची माणसं आमची संस्कृती’ हा कार्यक्रम नयना कुळकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला. अमळनेर महिला मंचतर्फे ‌‘सूर तेच छेडीता’ हा कार्यक्रम सादर केला. गुरुवर्य श्री बालचंद्र गुरुजी (केरळ) यांचा शिष्य परिवार कानुश्री संगीत विद्यालय, धुळे यांनी सादर केलेल्या भरतनाट्यमने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी ३१ जानेवारी रोजी गुरु सौ.नेहा जोशी यांचा शिष्य परिवार मुद्रा स्कूल ऑफ भरतनाट्यम, जळगावच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम्‌‍चे उत्कृष्ट असे सादरीकरण केले.

‌‘अशी पाखरे येती’ कार्यक्रमाने सांगता झाली. जळगावच्या यज्ञेश जेऊरकरने एकल तबला वादन सादर केले. संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता ‌‘अशी पाखरे येती’ कार्यक्रमात अमळनेर स्वरांजलीचे किशोर देशपांडे व सहकाऱ्यांनी केली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना अमळनेर शहरासह परिसरातील कलाप्रेमी तसेच साहित्य रसिक उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!