झाडी येथील संभाजी ब्रिगेड शाखा पुनर्रचित कार्यकारणी फलकाचे झाले अनावरण
अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवविचार हाच आजच्या गावगाड्यातील तरुणांच्या समस्यांवर उपाय असल्याचे मत वक्ते प्रा. प्रदीप देसले यांनी व्यक्त केले. अमळनेर तालुक्यातील झाडी येथे दि. २ मार्च रोजी होळी चौकात आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड शाखा पुनर्रचित कार्यकारणी फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक राम पवार, प्रमुख वक्ते प्रा. प्रदीप देसले, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, गावरानी जागल्या सेना संस्थापक विश्वास पाटील, सुरत येथील उद्योगपती प्रकाश भाई पाटील, संभाजी ब्रिगेडचे नगरसेवक श्याम पाटील उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष स्वानंद सयाईस, कार्याध्यक्ष निंबा लोटन पाटील, सचिव शशिकांत नानाभाऊ पाटील यांच्यासह इतर कार्यकारिणी निवड जाहीर करुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
व्याख्यानाचा कार्यक्रमात वक्ते प्रा. प्रदीप देसले यांनी आजच्या तरुणांमधील व्यसनाधीनता, बेरोजगारी, उत्तम मार्गदर्शक नेतृत्वाचा अभाव, वैफल्य, समाजातील विविध प्रथा परंपरा, जबाबदार युवकांचा दबाव गट, समाजकारण व राजकारण यावर प्रकाश टाकला. आजच्या गावगाड्यातील तरुणांच्या समस्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवविचार किती उपयोगाचा आहे ? हे पटवून दिले. तरुणाई ने तो विचार डीजे, बँड लावून नाचून न करण्यापेक्षा छत्रपतींचा विचार डोक्यात घालून शिवाजी महाराजांना समजून घेऊन करावा असेही आवाहन केले. याप्रसंगी गावातील इ.१० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंत, अमळनेर मार्केट कमिटी सदस्य पुष्पा विजय पाटील, साने गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल पाटील, गावातील पुरोगामी मार्गदर्शक बापू जगदाणे, अ. भा. युवक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मयूर पाटील आदींचा देखील सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष श्रीकांत चिखलोदकर, शिवधर्म प्रचारक आर. बी. महाराज, डॉ. संदीप पवार आदी मंडळी तसेच सबगव्हाण, शिरसाळे, चौबारी, गलवाडे येथील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष स्वानंद सयाईस यांनी तर प्रास्ताविक निंबा लोटन पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनिर्वाचित कार्यकारणीचे रविंद्र अशोक पाटील, संदीप रविंद्र पाटील, महेंद्र राजेंद्र भिल, फिरोज ऐनोद्दीन पिंजारी, प्रवीण बच्छाव पाटील, योगेश युवराज पाटील, गणेश सुभाष पाटील, मनोहर व्यंकट पाटील, हर्षल ज्ञानदेव पाटील, जयवंत चतुर पाटील, निलेश राजेंद्र पाटील, धनंजय अवचित बागुल, विकास नवल पाटील, भावेश नितीन पाटील, दीपक शिवाजी पाटील, दरबारसिंग राजेंद्र पाटील, सचिन बापू जगदाळे, राहुल रमेश महाले आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. तर त्यांना प्रा. डॉ. विलास पाटील, शिवश्री राकेश पाटील, फोटोग्राफर मनोहर पाटील यांनी मार्गदर्शन केले .