पीबीए इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

अमळनेर : येथील पीबीए इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त शालेय स्तरावरील वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचा पहिला गट व इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंत चा दुसरा गट अशा दोन विभागात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक व परीक्षक म्हणूनअमळनेर शहरातील विज्ञान शाखेसाठी कार्य केलेले अध्यापक व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक यांना आमंत्रित केले होते. यामध्ये प्रा. एम.एस. बडगुजर, प्रा. पी.आर. भावसार, विनोद कदम व भटू पाटील यांचा समावेश होता.

शहरातील मान्यवर, बहुसंख्य पालक व अन्य शाळांमधील शिक्षक व विद्यार्थांनी विज्ञान प्रदर्शनास उपस्थिती दिली. प्रदर्शनात सादर केलेल्या प्रयोगाची मिमांसा व कार्यप्रणाली समजावून घेतली. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सादर केलेले प्रोजेक्ट व वर्किंग मॉडेल बघून परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्ता, कल्पनाशक्तीचे कौतुक केले. भारताचा भविष्यकाळ भारताला महासत्ता बनवणारा असेल अशी अशी खात्री देत, लहान वयात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण व मानव जातीला उपयुक्त ठरेल, अशा शब्दांत संशोधनात्मक कार्याची स्तुती केली.

शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांनी मनोगतातून जागतिक स्तरावर भारत हा येणाऱ्या काळातील प्रयोग व संशोधनाची जननी म्हटली जाईल व एक प्रभावशाली महासत्ता बनेल, असा विश्वास व्यक्त केला. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन मा. डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षिका एम. एस. बारी, विज्ञान शिक्षिका सौ. व्ही. एस. अमृतकर, सौ. स्वाती माळी, सौ. सुवर्णा भावसार, सौ. डिंपल देसाई, सौ. प्रीती बडगुजर, सौ. व्ही. जी. बोरोले, एस. एस. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!