एकाचवेळी शासनाच्या विविध योजनांचे काम व सर्व्हर डाऊन मुळे सर्वांचीच अडचण

अमळनेर : केंद्रीय कल्याणकारी योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२४ विमा काढण्याची मुदत १५ जुलै २०२४ पर्यंत होती. परंतु एकाचवेळी शासनाच्या विविध योजनांचे काम ऑनलाईन असल्याने गेल्या आठ दिवसांपासून सर्व सर्व्हर डाऊन असल्या कारणाने अनेक शेतकऱ्यांचे पिक विमा काढण्याचे राहून गेले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्या अनुषंगाने अमळनेर येथील प्रकाशभाई पाटील युवा मंचच्या वतीने मा. ना. धनंजय मुंडे साहेब, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत वाढविण्यासंदर्भात दिनांक १३ जुलै २०२४ रोजी ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. आज दि. १५ रोजी जळगाव जळगाव येथे जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी कासार साहेब यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. यावेळी प्रकाशभाई युवा विकास मंच चे अध्यक्ष सुरेश अर्जुन पाटील, प्रसिद्धी प्रमुख शामकांत पाटील व प्रकाशभाई पटेल यांचे स्विय सहाय्यक गुलाब आगळे यांनी निवेदन दिले. शासनाने याची दखल घ्यावी असे मंचने म्हटले आहे.