अमळनेर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची बिनविरोध निवड

बँकेच्या सभासद व ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने कार्यरत राहण्याचा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मनोदय

संचालक नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करतांना.

अमळनेर : येथील दि अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पदी पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड एकमताने करण्यात आली. याप्रसंगी अमळनेरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील अनेकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थिती दिली. संचालक मंडळाच्या सभेत सहकारी संस्था सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एम. जगताप व सहाय्यक अधिकारी सुनिल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दि अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. संचालक मंडळाने नवनिर्वाचित चेअरमन पंकज मुंदडे व व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी मावळते चेअरमन मोहन सातपुते, व्हा.चेअरमन प्रदीप अग्रवाल, प्रविण जैन,भरत ललवाणी, पंडित चौधरी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील, दिपक साळी, लक्ष्मण महाजन, सौ.वसुंधरा लांडगे, डॉ. मनिषा लाठी, अॅड.व्ही आर पाटील, विजय बोरसे, बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील व कर्मचारी वृंद उपस्थित होते. जळगांव जिल्हा बँक असोशिएशनचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

दि.अमळनेर को. ऑप.अर्बन बँक शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. यानिमित्ताने नवनिर्वाचित पदाधिकारी बँकेच्या सभासदांच्या व ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने कार्यरत राहणार आहेत असा मनोदय नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी व्यक्त केला. बँकेच्या शतक महोत्सवी वर्षात वाटचाल करताना यंदाच्या वर्षी पुढील उपक्रमांची पायाभरणी होणार आहे.

यावेळी बँकेच्या परिसरात आयोजित सत्कार समारंभात बँकेचे माजी पदाधिकारी मा.नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, बँकेचे माजी चेअरमन गोविंद मुंदडे, खा.शि.मंडळ चेअरमन डॉ.संदेश गुजराथी, संचालक डॉ.अनिल शिंदे, हरी भिका वाणी, योगेश मुंदडे, निरज अग्रवाल, अध्यक्ष जितेंद्र झाबक, माधुरी पाटील, अजय केले, लालचंद सैनानी, संध्या शाह, डॉ.शशांक जोशी, जितेंद्र जैन, भरत कोठारी, महावीर पहाडे , मा.नगराध्यक्ष सुभाष चौधरी, पांडुरंग महाजन, मा.नगरसेवक श्रीराम चौधरी, प्रविण पाठक, श्याम पाटील, संजय कौतिक पाटील, मनोज पाटील, नरेंद्र संदानशिव, प्रताप शिंपी, राजू फाफोरेकर, विनोद कदम, संभाजी पाटील, जितू,नांढा, गोहिल, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, सचिव जितेंद्र ठाकूर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, गंगाराम महाजन, डॉ.रामदास शेलकर, ठाकूर समाज भावसार समाजाचे राज्य अध्यक्ष अरुण भावसार, चंद्रशेखर भावसार, अध्यक्ष दिलीप ठाकूर, अनिल ठाकूर, दिलीप जैन, प्रसाद शर्मा, हेमंत पवार, पु.साने गुरुजी ग्रंथालय चे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ, प्रा.सोमाणी, प्रा.देशमुख, प्रा.डॉ.लिलाधर पाटील, प्रा. संदीप नेरकर, प्रा.नितीन पाटील, प्रा.विजय तूंटे, प्रा.डॉ.धिरज वैष्णव, मिलिंद नवसारीकर, प्रदिप जैन, सुनिल चौधरी, प्रफुलचंद सिंघवी, विजय पाटील, डॉ.किरण पाटील, महेंद्रलाल कोठारी, दिपक गांधी, नितिन शाह, गिरीश भाई शाह, ॲड.सुरेश सोनवणे, ॲड. विवेक लाठी , ॲड. गोपाळ सोनवणे, ॲड. कुंदन साळुंके, आर्कीटेक आमोदकर, मुकुंद विसपुते, सत्तार मास्टर, बाळू पाटील, फिरोज पठाण, नबी पहिलवान, आरिफ भाया, सईद तेली, संजय शुक्ल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे सन्माननीय सभासद, हितचिंतक ग्राहक, प्रतिष्ठित व्यापारी, रोटरी क्लब , लायन्स क्लब, विविध समाज मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!