पी. बी. ए. इंग्लिश स्कूल अमळनेर द्वितीय, तर वावडे येथील श्री बी. बी.ठाकरे हायस्कूल तृतीय
अमळनेर : येथील गंगाराम सखाराम हायस्कूल येथे राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षण विभाग जि. प. जळगाव, पंचायत समिती -अमळनेर आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात साने गुरुजी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. मृणाल हेमकांत पवार हिने कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) : शक्यता व आव्हाने या विषयावर अप्रतिम सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळविला. दिनांक ३० जुलै २०२४ रोजी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) शक्यता व आव्हाने’ या विषयावरील अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील होते.
अमळनेर तालुक्यातील इ.८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांनी विज्ञान मेळाव्यात सहभाग घेतला. सादरीकरणात अमळनेेर येथील पी. बी. ए. इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु. हिमानी प्रमोद धनगर हिने द्वितीय क्रमांक तर वावडे येथील श्री बी. बी. ठाकरे हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. खुशी विनोद ठाकरे हिला तृतीय क्रमांक मिळाला. अमळनेर येथील डी. आर. कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. भाविका सुरेश वाल्हे व आदर्श विद्यालय अमळगाव ची विद्यार्थिनी कु. प्राची विनोद पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली.
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी बालवैज्ञानिकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स व शिक्षणक्षेत्र यांचा कसा जवळचा संबंध आहे ? अध्ययन अध्यापनात ए. आय. तंत्रज्ञानाचा विद्यार्थी व शिक्षकांनी कसा कौशल्यपूर्ण उपयोग करायचा ? याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. परिक्षक म्हणून माजी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, विज्ञान शिक्षक जगदीश पाटील यांनी कामकाज पाहिले. यावेळी तालुका विज्ञान मंडळाचे दिपक महाजन, बी. डी. ठाकरे, आनंदा धनगर, एन. डी. पाटील, श्रीमती सरोज पाटील, हर्षा पाटील, माधुरी पाटील, संगीता पवार, ललिता पाटील, देसाई मॅडम, रितीक जैन आदी उपस्थित होते. परिक्षक एस. डी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे, दाखले देत अनमोल असे मार्गदर्शन केले तर विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, सु. आ. पाटील विद्यालय ,पिंपळे बु. यांचा सेवानिवृत्तीचे औचित्य साधत तालुक्यातील विज्ञान शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गं. स. हायस्कूल चे मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर सुहास खांजोडकर, हेमंत महाजन, पं.स. चे विषय तज्ज्ञ प्रमोद पाटील, देवेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांनी तर आभार प्रमिला अडकमोल यांनी मानले.