अमळनेर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभेत खासदार स्मिता उदय वाघ यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत १७ जणांमध्ये स्मिता वाघ एकमेव महिला खासदार असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघात विजयी झाल्या आहेत. स्मिता वाघ यांनी याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य अशा महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे. भाजपाच्या संसदीय समितीने पहिल्यावेळी खासदार असूनही त्यांच्यावर प्रतोद पदाची महत्वपूर्ण जबाबदारी टाकली आहे. मुख्य प्रतोद पदी डॉ. संजय जयस्वाल तर स्मिता वाघ यांच्यासह १६ खासदारांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. महायुतीचे नामदार गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, नामदार अनिल पाटील, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, सर्व आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.