धरणगाव : महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनतर्फे वाशिम जिल्ह्यातील लाड कारंजा येथे दिनांक ३ ते ५ मे दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत जिल्ह्यातील अकरा उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या पंचांना काल दि.३१ जुलै रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांचे हस्ते राज्य पंच परीक्षेचे प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवलकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारार्थी किशोर चौधरी, नाशिक विभाग शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, महानगरपालिका क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे रविंद्र धर्माधिकारी, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष प्रविण पाटील यांची उपस्थिती होती.
उत्तीर्ण झालेल्या पंचामध्ये गिरीश चंद्रराव पाटील (इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेर), आशिषकुमार प्रभाकर चौधरी (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव), योगेश शशिकांत सोनवणे (बी. यू. एन. रायसोनी विद्यालय, जळगाव), राहुल सुभाष साळुंखे (कै. पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, भामरे,चाळीसगाव), सचिन लोटन सूर्यवंशी (सारजाई कुडे विद्यालय, धरणगाव), नितीन वसंत पाटील (आर. आर. विद्यालय, जळगाव), गिरीश युवराज महाजन (माध्यमिक विद्यालय, जळगाव), समीर विष्णू घोडेस्वार ( इंदिराबाई ललवाणी उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर), विशाल प्रल्हाद सोनवणे (भाऊसाहेब राऊत विद्यालय, जळगाव), धिरज किरण जावळे (बालविश्व विद्यालय, जळगाव), सुष्मित गिरीश पाटील (राष्ट्रीय खेळाडू जामनेर) यांचा समावेश आहे. यशस्वी पंचांचे जिल्हा क्रीडा संघटना महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ.नारायण खडके, क्रीडा मार्गदर्शक राधेश्याम कोगटा, महानगरपालिका क्रीडा समिती सदस्य नितीन बरडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, क्रीडा संघटक फारुख शेख, आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू उमाकांत जाधव, विराज कावडिया यांनी अभिनंदन केले आहे.