मराठा सेवा संघाच्या वतीने अमळनेर येथे मराठा वधु वर सूचक केंद्राचे उद्घाटन संपन्न

मराठा सेवा संघाच्या वतीने शहरात मराठा वधु वर सूचक केंद्राचे उद्घाटन संपन्न

लग्नातील खर्च कमी करण्यासाठी सामुदायिक विवाह वाढले पाहिजेत : शिवश्री संदीप पाटील


अमळनेर : येथील मराठा सेवा संघामार्फत काल दिनांक २७ ऑगस्ट रोजी ८५/ब, राका पार्क, प्रतापमिल कंपाऊंड, अमळनेर येथे वधुवर सुचक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शिवश्री बापूराव आनंदराव पाटील ( ठाकरे) आणि शिवमती पुनम ठाकरे या दांपत्याने ही जबाबदारी स्विकारली. वधू वर सूचक मंडळ ही काळाची गरज बनली आहे. सद्यस्थितीत अनेक वधू वर मंडळ स्थापन करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. लग्नांवरचा खर्च कमी करण्यासाठी सामुदायिक विवाह वाढले पाहिजेत असे मराठा सेवा संघ, धुळेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री संदीप पाटील यांनी वधुवर सुचक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी काढले. यावेळी मराठा सेवा संघ करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला.

वधुवर सुचक केंद्राचे उद्घाटन मराठा सेवा संघ, नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री राम पवार, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदिप घोरपडे, धनदाई महाविद्यालयाचे व मराठा सेवा संघ विभागीय सचिव शिवश्री प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, वधु वर सूचक व सामुदायिक विवाह कक्ष मराठा सेवा संघ धुळे जिल्हाध्यक्ष शिवश्री पी. एन. पाटील, मराठा सेवा संघ धुळे जिल्हाध्यक्ष शिवश्री संदीप पाटील, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. सुनील पवार, वधु वर कक्ष सचिव एच. ओ. पाटील, सुरेश पाटील, प्रा. डॉ. विलास पाटील, पारोळा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष डी. एम. सोनवणे, अमळनेर अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन रणजित शिंदे, शिवमती मिनाक्षीताई पवार, शिवमती वैशालीताई शेवाळे, शिवमती भारतीताई पाटील, जेष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी, पत्रकार दयाराम पाटील, प्रा. डॉ. संजय भदाणे, रामेश्वर भदाणे, अशोक पाटील, प्रेमराज पवार, प्रविण पाटील, प्रशांत पाटील, भटू पाटील, संजय पाटील, गुणवंत पाटील आदी उपस्थित होते.

शिवश्री संदीप पाटील म्हणाले की, मराठा सेवा संघ विविध कक्षाच्या माध्यमातून समाज हिताची अनेकोत्तम कार्य करीत आहे. आज समाजात दुर्लक्षित विषय म्हणजे विवाह संबंध जोडणी असल्याचे सांगितले. वधू वर सूचक मंडळ ही काळाची गरज बनली आहे. सद्यस्थितीत अनेक वधू वर मंडळ स्थापन करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपले ३३ कक्ष सुरु आहेत. समाजाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, समस्या आपण तेथेच वेगवेगळ्या कक्षांच्या माध्यमातून सोडवत असतो. अत्यंत महत्त्वाचा कक्ष ‘वधू वर कक्ष’ असून आपण अनेक वर्षापासून या कक्षाच्या माध्यमातून हजारो विवाह जमवण्याचं काम झाले आहे. यापूर्वी या कक्षाच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सुद्धा लावलेले आहेत. त्यावेळी डांगरी येथे आपण विधवांचा सुद्धा सामुदायिक विवाह लावलेला होता. त्या धर्तीवर सामुदायिक विवाह वाढले पाहिजेत. लग्नांवरचा खर्च कमी झाला पाहिजे ही जी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची शिकवण आहे. त्यानुसार मराठा सेवा संघ सर्वत्र काम करते. गेल्या वर्षी धुळ्यामध्ये जो वधू वर मेळावा घेतला तेव्हा सर्वांच्या संमतीने त्या ठिकाणी पाच महत्त्वाचे ठराव घेतले आणि ते ठराव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अत्यंत लोकप्रिय झाले. अनेक लोकांनी त्या ठरावाच्या माध्यमातून प्री-वेडिंग शूटिंग बंद करणे, लग्नामध्ये अक्षदांच्या ऐवजी फुलांचा वर्षाव करणे, पाकळ्यांचा किंवा मग टाळी वाजवून लग्न लावणे, लग्न वेळेवर लावणे हे जे अनेक असे महत्त्वाचे ठराव मांडले होते आणि लग्नाचे तीन तीन प्रकारचे विधी व्हायला लागले लग्न वेळेवर लागत नाही या सगळ्या पद्धती बंद करावयासाठी सगळ्या समाज बांधवांकडून मागणी होती. ठराव स्वरूपात हे मांडलं पाहिजे आणि ते ठराव प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून सगळ्या पत्रकार मित्र, सोशल मीडिया, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून प्रसार केला. प्रत्येक जिल्ह्यांनी त्या ठरावांचं अनुकरण करायला सुरुवात केली. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवधर्म पद्धतीने अगदी कमी खर्चात विना ब्राह्मणाचं लग्न लावतो. आपल्यातलेच काही जण विवाह लावून देण्यास तयार झालेत. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलादेखील या कार्यात सक्षम आहेत. अनेकदा ई बुक संकल्पना राबविण्यात यावी अशी सूचना केली जाते परंतु महिलावर्ग व ग्रामीण भागात ती राबविण्यात त्रूटी असल्याने काही काळ पुस्तके छापणे आवश्यक आहे. घटस्फोटाची प्रकरणे वाढत असल्याने धुळे येथे विनामुल्य समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दयाराम पाटील यांनी केले, बापूराव ठाकरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!