देवगांव देवळी हायस्कूल मध्ये अनोख्या पद्धतीने फोडली दहीहंडी

डोळ्यावर पट्टी बांधून उंच टांगलेली दहीहंडी फोडण्याची विद्यार्थ्यांना मिळाली संधी

अमळनेर : तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये ‘गोविंदा आला रे…’ म्हणत दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थी -विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने दहीहंडीचा आनंद घेतला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून उंचावर टांगलेली दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली होती. यात, आठवीतील विद्यार्थिनी कु. तनुश्री सोनवणे ने अचूकपणे दहीहंडी फोडली. तिचे अभिनंदन करण्यात आले.

दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी शाळेतील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मधील इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक अरविंद सोनटक्के, ईश्वर महाजन, एच. ओ. माळी, एस. के. महाजन व शिक्षकेतर कर्मचारी संभाजीराव पाटील यांनी प्रयत्न केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!