ॲड. ललिता पाटील यांची शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी नियुक्ती

अमळनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना (उबाठा) च्या महाराष्ट्र राज्य संघटक पदी ॲड. ललिता श्याम पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ॲड. ललिता पाटील यांनी केलेले भरीव काम, त्यांच्यातील कार्यकर्ते संघटन कौशल्य तसेच अमळनेर येथे नुकताच झालेला शिवसेनेचा मेळावा यशस्वीतेसाठी केलेले संघटनात्मक कार्य याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची महाराष्ट्र राज्य संघटक पदी नियुक्ती केली. ही नियुक्ती त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे. अल्पावधीत झालेल्या त्यांच्या निवडीमुळे अमळनेर तालुका व शहर शिवसेनासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत , सहसंपर्क प्रमुख गुलाब वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, डॉ. हर्षल माने, महानंदा ताई पाटील, युवासेना सचिव विराज कवाडिया, जिल्हा युवासेना प्रमुख निलेश चौधरी तसेच जिल्ह्यासह अमळनेर शहरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडून अभिनंदन केले जात आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!