व्हाॅईस ऑफ मीडियाचे सर्व पत्रकार, मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी कर्मचारी, शहरातील सर्व वृत्तपत्र विक्रेते बांधव यांच्या कुटुंबीयांनी घेतला शिबिराचा लाभ

अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व्हाॅईस ऑफ मीडियाचे सर्व पत्रकार, मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व सेवेकरी कर्मचारी, अमळनेर शहरातील सर्व वृत्तपत्र विक्रेते बांधव यांच्या कुटुंबीयांसाठी शनिवार, दिनांक २४ ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, जयश्री साबे, उज्ज्वला शहा, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, प्रकाश मेखा, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम शिबिराचे उद्घाटन मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, गोदावरी फाउंडेशनचे डॉ. दिनेश चौधरी, डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. शुभम कॉलरा, डॉ. सुमित भोसले, डॉ. तेजस सोनवणे, डॉ. कुशल धांडे, डॉ. अभिलाश मोवाळे, डॉ. जान्हवी मापारी, डॉ. अजय राख, डॉ. तुषार चले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाले. मंगळग्रह संस्थेतर्फे गोदावरी फाऊंडेशन कडून आलेल्या सर्व टीम चा यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले म्हणाले की, सकारात्मक भावनेने आजाराचे निदान लवकर करुन घेतल्यास कटू प्रसंगातून सावरता येते. यासाठी सर्वांनी आपापल्या कुटुंबातील आरोग्य तपासणी वर्षातून दोनदा तरी करावी असे आवाहन करत शिबिर घेण्यामागचा उद्देश सांगितला.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब, ईसीजी (कार्डिओग्राफ), २ डी इको यंत्राद्वारे रुग्णांची तपासणीसह उपचार, निदान तसेच मार्गदर्शन करण्यात आले. यात नाक कान घसा विकार, नेत्र विकार, मुळव्याध, पोटाचे विकार, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, हृदयरोग, स्त्री रोग तपासणी करण्यात आल्या. तपासणी झाल्यानंतर ज्यांना आवश्यक आहे त्यांना मोफत औषध वितरणही करण्यात आले. जिल्हा मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव प्रविण माळी, खजिनदार रवींद्र चौधरी, उपाध्यक्ष निलेश पाटील, ज्येष्ठ सभासद नरेंद्र पाटील यांनी मोफत औषधे उपलब्ध करुन दिली. आरोग्य तपासणी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होती. या शिबिरात सुमारे शंभराहून अधिक जणांनी आपली शारीरिक तपासणी करुन घेतली.
या कामी गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील, डॉ. सौ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयाचे आशिष भिरुड, रत्नशेखर जैन व त्यांच्या टीमने सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केले तर डी. ए. सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगळग्रह संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, मंगल सेवेकरी तसेच गोदावरी फाउंडेशनचे मोहम्मद हुसेन, रुतूजा अवाघडे, श्रावण कऱ्हार, रितेश पोटोळे, रितू भिलावेकर, प्रिती वसावे, प्रतीक्षा दाते यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे दिवसभर पावसाची रिपरिप असूनही तपासणीसाठी अनेक जण सहभागी झाले होते. मंगल सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.