पोलीस दलात निवड झालेले सामान्य कुटुंबातील तिघेही अमळगाव गावचे रहिवासी
अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथील सामान्य कुटुंबातील प्रताप महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे तीन माजी छात्रसैनिकांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली. शैक्षणिक वर्ष २०१९ ते २०२२ या कालावधीत हे विद्यार्थी एनसीसी चे सक्रिय छात्रसैनिक होते. तसेच ते भूगोल विभागाचे माजी विद्यार्थी देखील होते. विशेष म्हणजे पोलीस दलात निवड झालेले तीनही विद्यार्थी अमळगाव येथील रहिवासी आहेत. यात.. १) निलेश बुधा कुंभार, २) जयवंत संजय कुंभार, ३) सौरभ गुलाबराव कोळी यांची निवड झाली आहे. दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचा पासिंग आऊट परेड (शपथ ग्रहण समारोह) संपन्न झाला. त्यातील दोन कुंभार बांधवांनी लातूर येथे ट्रेनिंग पूर्ण केले तर सौरभने सोलापूर येथे ट्रेनिंग पूर्ण करून मुंबई येथील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ते रुजू झालेत.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, सौ. माधुरी पाटील, विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सी ए निरज अग्रवाल, जेष्ठ संचालक हरी वाणी, डॉ. अनिल शिंदे, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, कल्याण पाटील, विनोद पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण बी.जैन, संस्थेचे सह सचिव डॉ. धिरज वैष्णव, महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर लेफ्ट. डॉ. प्रमोद चौधरी, भूगोल विभाग प्रमुख डॉ. कैलास निळे, विभागातील डॉ. किरण गावित, डॉ. महेंद्र महाजन, प्रा.चंद्रशेखर वाडे, तसेच सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन…!