नामदेव सूर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी ह.भ.प. नामदेव पर्बत सूर्यवंशी यांचे आज सोमवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. खवशी येथील भजनी मंडळात ते पूर्वीपासून सक्रिय होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरुन निघेल. खवशी येथील रणछोड पाटील यांचे ते वडील होत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो, हीच दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!