
अमळनेर : येथील विद्याविहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिरासमोर सोमवारी क्रेनच्या साह्याने २१ फूट उंच त्रिशूल ची विधीवत स्थापना करण्यात आली. रविवारी दुपारी चार ते सात दरम्यान शिरुड नाका, वड चौक, पाचपावली देवी, बस स्टॅन्ड, डॉक्टर बहुगुणे हॉस्पिटल, भगवा चौक, विद्या विहार कॉलनी आदी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पुरुष, महिला, युवती, बालकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. मिरवणूकीत ट्रॅक्टर वर २१ फूट उंच त्रिशूल सजविण्यात आले होते. मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी सुवासिनींकडून त्रिशूल पूजा करण्यात आली. विद्येश्वर महादेव मंदिरासमोरील जागेत या २१ फूट उंच त्रिशूल ची स्थापना करण्यात आली आहे. साहजिकच मंदीर परिसरात चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील, आदित्य बिल्डरचे संचालक प्रशांत निकम, पत्रकार ईश्वर महाजन, कपिल पाटील, संजय पाटील, राहुल शेळके, अमोल पाटील, कल्पेश साळुंखे, सुनील शिंगाणे, मोहित पवार, भैय्या साळुंखे, तेले सर, सागर पाटील, किरण अहिरे, विवेक तेले, मिलिंद वारुळे, प्रविण गुजर, परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
