तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत डी. आर. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींचे यश; जिल्हा स्तरावर निवड

अमळनेर : तालुका क्रीडा परिषद आयोजित शासकीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा नुकत्याच जय योगेश्वर कॉलेज महाविद्यालय येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत तालुक्यातील मुला मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सर्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यात, खा. शि. मंडळाच्या डी. आर. कन्या हायस्कूल अमळनेरच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींनी आपल्या अष्टपैलू उत्कृष्ट खेळामुळे प्रथम स्थान मिळवून जिल्हास्तरावर त्यांची निवड करण्यात आली. याचप्रमाणे बॅडमिंटन क्रीडा प्रकारात आर्या भांडारकर व श्रावणी मोरे या १७ वर्ष आतील मुलींनी उत्कृष्ट खेळाची बाजी मारली. मैदानी खेळातही काही विद्यार्थिनींनी तालुक्याला प्रथम स्थान मिळवून दिले. कॅरम स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात दिक्षा सरदार तर फ्री स्टाईल कुस्ती १४ वर्षीय गटात यशस्वी शिंगारे व १७ वर्ष गटात खुशी बोरसे या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व विजेत्यांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन निरज अग्रवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, पर्यवेक्षक एस. पी. बाविस्कर यांनी देखील विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मुलींच्या या यशामागे क्रीडाशिक्षक के. आर. बाविस्कर व आर. एस. सोनवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!