अमळनेर : नामांकित उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल दि. ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. काल सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
सन १९६१ मध्ये टाटा स्टीलमधून रतन टाटा यांनी आपल्या उद्योग जगतातील कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. प्रचंड मेहनतीच्या जोरावर टाटांनी समूहाला वेगळ्या उंचीवर नेले. अनेक दशके उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही परोपकार आणि दानधर्म करण्याचा वसा त्यांनी पाळला. आपल्या कमाईतला काही वाटा ते दरवर्षी धर्मादाय कार्यात खर्च करत. चार वर्षांपूर्वी देशावर कोरोनाचे संकट आले त्यावेळी रतन टाटा यांनी पीएम केअर फंडाला १०० कोटी रुपये दिले होते आपल्या कार्य कर्तृत्वाने रतन टाटांनी जगभरात छाप निर्माण केली. त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !