मतदार जनजागृती रथाला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दाखविला हिरवा झेंडा

अमळनेर : मतदानाबाबत जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मंगळवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मतदार जनजागृती रथाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखविला. व्हॉईस ऑफ मीडिया व मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर जिल्हाधिकारी भिमराज दराडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, जिल्हा सहाय्यक नियोजन अधिकारी राहुल इधे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन उद्योग समूहाचे मीडिया डायरेक्टर अनिल जोशी, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, गस पतपेढीचे संचालक राम पवार, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जिल्हा सरचिटणीस हेमंत वैद्य, साप्ताहिक विंग चे तालुकाध्यक्ष अजय भामरे आदी उपस्थित होते.
मतदार जनजागृती रथ उपक्रमाचा आदर्श घेत इतर सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियाने केलेला मतदार जनजागृती रथ उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. या मतदार जनजागृती रथामुळे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे. या उपक्रमाचा आदर्श घेत इतर सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनीही मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती रथ या उपक्रमाचे कौतुक करत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून ‘तू लढला नाहीस तरी चालेल, पण.. विकला जाऊ नकोस’, ‘मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो’ आदी घोषणा देण्यात आल्या. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात हा मतदार जनजागृती रथ गावोगावी फिरून लोकांना मतदानाबाबत जागृती करणार आहे. या माध्यमातून मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे गीत -संगीताच्या सहाय्याने आवाहन करण्यात येत आहे. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे ज्येष्ठ सल्लागार विवेक अहिरराव, उमेश धनराळे, मिलिंद पाटील, जयंतलाल वानखेडे, बापूराव ठाकरे, शरद कुलकर्णी, दिनेश नाईक, दयाराम पाटील, जगदीश पाटील, उमाकांत ठाकूर, राहुल पाटील, किरण चव्हाण, संजय पाटील उपस्थित होते.
