‘मराठी लाईव्ह न्युज’ वेब पोर्टल मधून मिळतो सर्वसमावेशक बातम्यांना न्याय

अमळनेर शहरातून सुरु झालेल्या ‘मराठी लाईव्ह न्युज’ वेब पोर्टल चा आज पाचवा वर्धापनदिन साजरा होतो आहे. वर्धापनदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा ! ‘मराठी लाईव्ह न्युज’ च्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न…
समाजात बदल घडविणे ही सर्वात कठीण गोष्ट नसून आपल्या स्वतःमध्ये बदल घडविणे हेच सर्वात कठीण असते. त्यासाठी आपण कोण आहोत ? आपली पात्रता काय ? याचे आत्मपरीक्षण करुन मगच समाज बदलाची भूमिका घ्यायला हवी. समाजात बदल घडेलच हे सांगणे अवघड असले तरी स्वतःमध्ये बदल घडवून सामाजिक उत्तरदायित्व निभावणारे शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन यांच्या रुपाने पहावयास मिळते.
थोडक्यात परिचय…
- पूर्ण नाव… ईश्वर रामदास महाजन
- मूळ गाव… कळमसरे, ता. अमळनेर, जि. जळगाव.
- जन्म दिनांक… दिनांक १ जून १९७४
- शिक्षण… एम.ए.बी.एड, (भूगोल, मराठी)/ बी.ए. (हिंदी) / पत्रकारिता पदवी मुंबई विद्यापीठ (२०१०) / पत्रकारिता पदवी कोर्स -यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (२०२२)
- एकूण भाऊ… तीन
- विवाह दिनांक… १६ जानेवारी २००३
- अपत्य… दोन मुले
- वडिलांचे निधन… २० सप्टेंबर २००८
- आईचे निधन… २८ मार्च २०२१
घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना खडतर प्रवासातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या गुणवत्तेवर शिक्षकाची नोकरी मिळाली. नोकरी करताना गुरु शिष्याचे नाते ते निभावत आहेत. स्वत: पदरमोड करुन विद्यार्थ्यांना मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ते करीत असतात. त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपता यावी यासाठी मुल्याधारित पत्रकारिता जपत आहेत. देशोन्नती, सत्यमय, साईमत वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या महाराष्ट्र सारथी, युनायटेड खानदेश, धुळे दवंडी चे पत्रकार म्हणून ते काम करीत आहेत. स्व मालकीचे ‘मराठी लाईव्ह न्युज’ वेब पोर्टल चे ते मुख्य संपादक आहेत. विविध संस्थांवर पदे भूषवली असून अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

साधारणपणे सन २००५ मध्ये कळमसरे या त्यांच्या गावातून ईश्वर महाजन यांनी दैनिक देशोन्नती या वृत्तपत्राचे ग्रामीण वार्ताहर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं. आठ वर्षे दैनिक देशोन्नती चे कळमसरे येथील ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केल्यानंतर एक वर्ष अमळनेर शहर प्रतिनिधी अशी जबाबदारी पार पाडली. पुढे दैनिक साईमत वृत्तपत्रात पाच वर्षे अमळनेर तालुका प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली. आपण समाजाचे देणे लागतो. या विचारातून आपले स्व मालकीचे वेब पोर्टल असावे असा विचार त्यांच्या मनात आला. मनाचा हेतू शुद्ध असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते.. हवी असते ती प्रयत्नांची जोड. एका शिक्षकाचे स्वप्न दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रत्यक्षात साकारले आणि स्व-मालकीचे ‘मराठी लाईव्ह न्युज’ नावाचे वेब पोर्टल उदयास आले. अल्पावधीतच आपलं वेगळेपण निर्माण करुन समाजात आपली छाप उमटवली.

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही ईश्वर महाजन यांची धारणा असल्याने ते प्रगतीच्या वाटेवर आहेत असे मला वाटते. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि उद्योग आदी विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच प्रसिद्धी दिली. अंधारातील योग्य माणसाला प्रकाशात आणण्याचे काम केले. सन २०२३ मध्ये ‘मराठी लाईव्ह न्युज’ च्या चौथ्या वर्धापनदिन पासून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १० जणांना विशेष कार्यक्रमात नामांकित मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्व गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यास सुरुवात केली. तीच परंपरा कायम राखत आज ‘मराठी लाईव्ह न्युज’ चा पाचवा वर्धापनदिन साजरा होतो आहे. या उपक्रमास वाचक, जाहिरातदार यांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मिळालेल्या शुभेच्छा कामी आल्या हे मात्र खरं.
महाजन यांची पत्रकारिता ही केवळ त्यांच्या कार्याची मान्यता नाही, तर ती पत्रकारितेतील लोकप्रभुत्व, आणि समाजासाठी करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेचीही एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या पत्रकारितेतून पत्रकार क्षेत्राला एक नवा विचार मिळाला आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या कार्यामुळे पत्रकारिता उज्ज्वल होईल, अशी आशा आहे.
ज्येष्ठ पत्रकार जी. टी. टाक, महात्मा फुले हायस्कूल देवगाव संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश भाऊ पोहरे, दैनिक साईमत चे मुख्य संपादक प्रमोदभाऊ ब-हाटे, ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले, शिक्षक मित्र अरविंद सोनटक्के, हिंदी अध्यापक मंडळ व व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळ, साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजयसिंह पवार, सौ. वसुंधरा लांडगे, नानासाहेब दशरथ लांडगे, डिझायन लक्ष्मीकांत सोनार तसेच सानेगुरुजी वाचनालयाचे कर्मचारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत असते. साहित्यिक जयसिंग वाघ, प्रा. अतुल इंगळे जळगाव, डॉ. रविंद्र भोळे पुणे, शशिकांत हिंगोणेकर, मनीलाल शिंपी ठाणे, डॉ . मिलिंद बागूल, भरत शिरसाठ एरंडोल, गोकूळ बागूल, ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी, सोपान भवरे, शरद पाटील, मुंबईचे विशेष प्रतिनिधी उदय नरे, पक्षीमित्र अश्विन पाटील यांच्या वैचारिक लेखनाची मेजवानी वाचकांना ‘मराठी लाईव्ह न्युज’च्या माध्यमातून चाखायला मिळते. सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे ‘मराठी लाईव्ह न्युज’ वेब पोर्टल अशी ओळख अल्पावधीतच झाली. मराठी लाईव्ह न्युज हे फक्त अमळनेर तालुक्यापुरते मर्यादित राहिले नसून आता अनेक जिल्ह्यांमध्ये वाचक, जाहिरातदार झाले आहेत. पत्रकारिता हा व्यवसाय नसून, ती एक समाजसेवा आहे.. ही बाब लक्षात घेऊन वेब पोर्टलच्या माध्यमातून एक वेगळं समाधान देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याकामी कार्यकारी संपादिका सौ. ज्योती ईश्वर महाजन यांचे सहकार्य लाभते. ‘मराठी लाईव्ह न्युज’ चा आलेख असाच चढता राहो ! हीच या वर्धापन दिनी दिव्यचक्र परिवार कडून शुभेच्छा..!
✍🏻 संजय यमुना उत्तम सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार (भ्रमणध्वनी : ९८५०८१५३४२)
• संपादक : दिव्यचक्र न्यूज पोर्टल, अमळनेेर.
• जिल्हाध्यक्ष : व्हॉईस ऑफ मीडिया, साप्ताहिक विंग, जळगाव.
