अमळनेर विधानसभा मतदार संघात माघारीनंतर बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

तिरंगी लढतीत नऊ अपक्षांमुळे लढत अटीतटीची होणार

अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदार संघ २०२४ च्या निवडणुकीसाठी प्राप्त झालेले उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिनांक ४ नोव्हेंबर शेवटचा दिवस होता. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांचेकडील प्राप्त माहितीनुसार, अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये, नोंदणीकृत राजकीय पक्षाचे दोन उमेदवार, राष्ट्रीय व राज्य स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा एक उमेदवार तसेच नऊ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

या उमेदवारांमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस चे डॉ. अनिल नथ्थु शिंदे (हात), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील (घड्याळ), बहुजन समाज पार्टीचे सचिन अशोक बाविस्कर चोपडा (हत्ती) याशिवाय.. अपक्ष उमेदवारांमध्ये अनिल भाईदास पाटील -रणाईचे (केक), अमोल रमेश पाटील -अमळगाव (ग्रामोफोन), छबिलाल लालचंद भिल -कोळपिंप्री (दूरदर्शन), निंबा धुडकू पाटील -वाघोदे (किटली), प्रा. प्रतिभा रविंद्र पाटील -अमळनेर (प्रेशर कुकर), यशवंत उदयसिंह मालचे -अमळनेर (विजेचा खांब), रतन भानू भिल -भोलाने (शिट्टी), शिरीष हिरालाल चौधरी -अमळनेर (बॅट), शिवाजी दौलत पाटील -लोन बुll (ऑटो रिक्षा) यांचा समावेश आहे. काहींनी एकच चिन्ह मागणी केल्याने लकी ड्रॉ पद्धतीने चिन्हांचे वाटप करण्यात आले. अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी कैलास दयाराम पाटील, सौ. जयश्री अनिल पाटील, अशोक लोटन पवार, प्रथमेश शिरीष चौधरी या चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारीनंतर आता बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून तिरंगी लढत होईल असे चित्र असले तरी नऊ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने लढत अटीतटीची होईल असे बोलले जात आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!