करणखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप

मारवड : अमळनेर तालुक्यातील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे एनएसएस दत्तक गाव करणखेडा येथे दि. २५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिराचा समारोप झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड चे उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री जयंतराव मन्साराम पाटील (अध्यक्ष, ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) उपस्थित होते.

युथ फाॅर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटलसी, स्वच्छ भारत अभियान विशेष मोहीम, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, मतदार जनजागृती अभियान, माय भारत युवा पोर्टल नोंदणी, जागो ग्राहक जागो, अन्नपदार्थ सुरक्षा जनजागृती मोहीम, दत्तक गावातील कार्याचा उजाळा इत्यादी नियोजित प्रकल्प पूर्ण करून राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी संस्कार शिबिर संपन्न झाले. गणेश शांताराम गुरव यांच्याकडून विद्यार्थ्यांना ट्रॉफी भेट देण्यात आल्या. यावेळी एनएसएस स्वयंसेवकांना देविदास पाटील आणि शामकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. एनएसएस स्वयंसेवकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सचालक युवराज काशिनाथ पाटील, विश्वासराव विनायकराव पाटील, राजेंद्र फकीरा पाटील, दिनेश वासुदेव साळुंखे यांचेसह के. व्ही. पाटील (प्रशासकीय अधिकारी), महेंद्र सुरेश पाटील (उपसरपंच, करणखेडा) सुधाकर यशवंत पवार (माजी सरपंच, करणखेडा), श्यामकांत बळीराम पाटील, लक्ष्मण जुलाल पाटील, सौरभ गुलाबराव भागवत, मधुकर कौतिक पाटील, गणेश शांताराम गुरव, नंदकिशोर शंकरराव पवार, दिलीप यशवंत पाटील, प्रविण यशवंत पाटील, राकेश बारकू पाटील तसेच गावातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. सतीश पारधी (एनएसएस कार्यक्रम अधिकारी ) यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. पाटील, प्रा. डॉ. नंदा कंधारे (एनएसएस महिला कार्यक्रम अधिकारी) प्रा. किशोर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण ने तर कोमल पाटील हिने आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!