पुणे येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी पार पडणार स्पर्धा; विजेत्यांना मिळणार ‘इंदिरा करंडक २०२४’

पुणे : इंदिरा सोशल फाउंडेशन, पुणे संस्थेने गेल्या नऊ वर्षात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या वर्षापासून प्रथमच संस्थेने राज्यस्तरीय खुली महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा ‘इंदिरा करंडक २०२४’ आयोजित केलेली आहे. दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजेपासून ही स्पर्धा चीमा सभागृह, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी पार पडेल. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमधून विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले व शिक्षण पूर्ण झालेले वय वर्ष २५ वर्षे वयापर्यंतचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कौशल्य विकास होण्यासाठी मदत होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम द्वितीय तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ अशी बक्षिसे दिली जाणार असून उत्कृष्ट असे करंडक सन्मानपत्र आणि रोख रक्कम अनुक्रमे प्रथम १५०००/-, द्वितीय ११०००/-, तृतीय ७०००/- आणि उत्तेजनार्थ ३०००/- याप्रमाणे दिले जाणार आहेत. वकृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी फी रुपये १००/- असेल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इंदिरा सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. वकृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील (भ्रमणध्वनी क्र. ९०२८८३८०८२) व ॲड. पुजा यादव (भ्रमणध्वनी क्र. ९११२८४१६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
