करणखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न

मारवड : अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे एनएसएस दत्तक गाव करणखेडा येथे दि. १९ डिसेंबर रोजी शहीद सैनिक कुटुंब सदस्य शरद दिलीप बागुल यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील हे उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड चे उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील, सेक्रेटरी देविदास बारकू पाटील, संचालक सर्वश्री युवराज काशिनाथ पाटील, विश्वासराव विनायकराव पाटील, लोटन शिवदास पाटील, चंद्रकांत रामराव शिसोदे, मनोज हिम्मतराव साळुंखे, दिनेश वासुदेव साळुंखे तसेच महेंद्र सुरेश पाटील (उपसरपंच करणखेडा ग्रामपंचायत), अलकाबाई गुलाबराव धनगर (सरपंच ग्रामपंचायत करणखेडा), शांताराम शामराव पाटील (माजी जि. प.सदस्य), राकेश गुरव (अध्यक्ष विकास मंच मारवड), ताराचंद सिताराम सूर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते), हरिभाऊ नथू मारवडकर (चेअरमन सार्वजनिक वाचनालय मारवड), नरेंद्र शांताराम पाटील (सदस्य महाविद्यालय विकास समिती), कविताबाई महेंद्र पाटील (माजी सरपंच करणखेडा), कविताबाई भानुदास धनगर (माजी सदस्य ग्रामपंचायत करणखेडा ) उपस्थित होते. तसेच विनायकराव यादवराव पाटील, माध्यमिक विद्यालय करणखेडा येथील मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

हिवाळी श्रम संस्कार शिबिरात सकाळच्या सत्रात जागर, प्रार्थना, ध्यानधारणा, योगासने, चहापान व अल्पोपहार, श्रमदान, स्वयं स्वच्छता, दुपारच्या सत्रात भोजन, गीत मंच, व्याख्याने तसेच संध्याकाळच्या सत्रात चहापान, मैदानी खेळ व गटचर्चा, भोजन व रात्रीचे सत्रात सामाजिक विचार मंथन व दैनंदिन लिखाण तसेच दत्तक गावातील समस्यांवर चर्चा, दीप मालवण आदी कार्यक्रम राबविण्यात आले. दररोज बौद्धिक प्रबोधन- आपत्ती व्यवस्थापन, मूल्य शिक्षण काळाची गरज, स्वच्छ भारत युवा संवाद, इंडियातून भारत निर्माण करणे, विकासातून युवकांचे योगदान, शाश्वत ग्रामविकास, जागो ग्राहक जागो, माझी वसुंधरा, मतदार जनजागृती, मानवी जीवनातील योगाचे महत्व, पाणी व्यवस्थापन, बालविवाह कायदा, बालविवाह थांबवण्यासाठी जनजागृती. यावरील विषयांवर मान्यवर व्याख्यात्यांचे बौद्धिक प्रबोधन केले जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप दि.२५ डिसेंबर रोजी होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!